Description
डॉ. सुकृत खांडेकर गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय पत्रकारितेत असून दैनिक प्रहारचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. केसरी व सकाळ (पुणे) नंतर केसरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, नवशक्ति आणि प्रहार (मुंबई) अशी त्यांची वार्ताहर ते संपादक पत्रकारितेतील प्रदीर्घ वाटचाल आहे. नवी दिल्लीत ते लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी होते. शिवसेना या राजकीय पक्षाच्या सामना या मुखपत्राचा अभ्यास या विषयावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच. डी. संपादन केली. लोकसत्तामधून लाल किल्ल्यावरून तसेच अन्य वृत्तपत्रांतून स्टेटलाइन, इंडिया कॉलिंग, महाराष्ट्र कॉलिंग, मुंबईचे वार्तापत्र असे स्तंभलेखन त्यांनी खंड पडू न देता नियमित केले.
डॉ. सुकृत खांडेकर हे अ. भा. मराठी पत्रकार परिषद व मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते बारा वर्षे विश्वस्त होते. विविध पत्रकार संघ व वृत्तपत्र लेखक संघांचे आजवर त्यांना दोन डझन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सडेतोड भाष्य करणारे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहे.
पाने: 172
Reviews
There are no reviews yet.