Description
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
गोष्ट सांगते नव्वी जुन्नी
सोनूही येतो
सागरही येतो
चंदाही येते
येते चिन्नी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
गोष्टीत सुतार
गोष्टीत कुंभार
गोष्टीत राजा
गोष्टीत राणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
झोपडीचं दार
धूळ फार-फार
छोट्याशा बोळात
सांड-पाणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
कामाला आई
कामाला बाबा
फाटक्या कपड्यांत
मुलं अनवाणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
मुलं जमतात
गोष्टीत रमतात
खुदुखुदु हसतात
डोळ्यांत पाणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी.
खाऊ नाही डब्यात
भूक खूप पोटात
घागरीतून घोट- घोट
पितात पाणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
मिन्नीचं ऐकून
वाचून लिहून
वस्तीतली मुलं
होतात शहाणी
गोष्ट सांगते छोटी मिन्नी
गोष्ट सांगते नव्वी जुन्नी
– डॉ. सुमन नवलकर
पृष्ठ संख्या : 116
Reviews
There are no reviews yet.