Description
तुमच्यासाठी बांधला मी
एकदम धट्टाकट्टा
धमाल बाल-कट्टा
खेळा, नाचा, मजा करा
आनंदाने सारे
लुटा चंद्र, लुटा सूर्य, चमचमणारे तारे
इथे डोंगर हसेल
आणि नदी थोडी रुसेल
झाड आपली फळे घेऊन आकाशात उडेल
ओंजळ ठेवा उघडी
आणि डोळे थोडे मिटा
बोरे, चिंचा मिळाल्यावर धून पळत सुटा
पुन्हा या कट्ट्यापाशी
अभ्यास करून सारा
आनंदाच्या बरसतील अंगावरती धारा…!
– अशोक बागवे
पाने : 50
Reviews
There are no reviews yet.