Description
बहारदार एकपात्री
नाट्यछटा हा नाट्यप्रकार सध्या दुर्मिळ होत आहे. आजच्या काळात त्याविषयी जागृती करण्याचे महत्त्वाचे काम डोंबिवलीच्या मेघना पाध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात लेखणीद्वारे करीत आहेत. नाट्यछटांमधून नाट्यविषयीचे विविध रंग शिकता येतात. लेखिकेने आपल्या नाट्यछटा लेखनातून बाल प्रबोधन आणि बालसंवर्धन लीलया साधले आहे. हीच त्यांच्या लेखणीची ताकद आहे.
शालेय संस्थांनी हे पुस्तक विकत घेऊन मुलांकडून नाट्यछटांचे प्रयोग करून घ्यावेत. यातूनच उत्तम कलाकार आणि प्रेक्षक निर्माण होतील. या नाट्यछटा मराठी भाषेला नाट्य, मालिका, चित्रपट माध्यमासाठी पोषक ठरतील याची व्यास क्रिएशन्स्ला खात्री आहे.
पाने : 44
Reviews
There are no reviews yet.