Description
मी गहन लिहितो
पण सोप्या भाषेत
नि मी सोपस लिहितो
ते गहन असते
गगनाचे मौन
जाणतात मेघ
नि विजेची रेघ उगाच लवथवते काहूरगर्भ मधाळ
धरतीचे उत्सुक डोळे
पाणावतात जेव्हा
गगन झुकते खाली लीन होऊन
तेव्हा शालीन धरित्री
आतून अंकुरते
तिचे बहरलेले मौन
मी लिहितो गगन होऊन
सोपस भाषेत
निरंतराचे निर्वाण होत असताना गहनगर्भ !
– अशोक बागवे
पाने : 80
Reviews
There are no reviews yet.