Description
तुम्हा सर्वांनाच अल्लाउद्दिनच्या चिरागची गोष्ट माहिती असेलच. अल्लाउद्दिनला चिराग मिळाल्यानंतर त्याची गरिबी दूर होते, मात्र त्याच्यावर अनेक संकटेही येतात. या सर्व संकटांवर मात करत अल्लाउद्दिन दुष्टांचा नाश करतो, तो चांगुलपणा या गुणाच्या बळावर, केवळ जादूच्या दिव्यामुळे नव्हे, बरं का…
विचार करा बालगोपाळांनो, तुम्हाला जर असा दिवा मिळाला तर तुम्ही काय कराल? अशी कोणती जादू कराल ज्यामुळे तुमची सगळी चिंता छू-मंतर होऊन जाईल? आपल्या नाटकातल्या लाडोबालाही असा चिराग म्हणजेच जादूचा दिवा मिळालाय आणि मग लाडोबा कोणकोणती जादू करतो, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हे बालनाट्य तुम्हाला वाचलंच पाहिजे. चला तर लाडोबासोबत जादूच्या दिव्याची जादू आजमावून बघूया…
पाने : 36
Reviews
There are no reviews yet.