Description
एक विद्यार्थी आदर्श नागरिक होण्याच्या प्रक्रियेत अनेक चढउतार येतात. या मार्गात त्याचे बालपण हा अतिशय महत्त्वाचा काळ ठरतो. निसर्गाने बहाल केलेल्या बौद्धिक व भावनिक बळावर हे बालपण फुलत जायला हवे. रंजक, उद्बोधक कथा आणि कवितांमधून या बालपणाचा एक भक्कम पाया तयार होतो. सिद्धहस्त लेखिका मिना खोंड ‘अलेक्सा’ या पुस्तकातून त्यांच्या वैविध्यपूर्ण बालकथा व कवितांमधून मुलांना असाच रंजक, उद्बोधक आनंद देतात. मुलांच्या संवेदनशील मनावर नकळत उत्तम संस्कार करण्याचे प्रयत्न करतात. विज्ञान, पर्यावरण, सामाजिक भान, दैनंदिन आहारविहार या बरोबरच एक उत्तम माणूस घडविण्यासाठीचे सर्व संस्कार या कथांमधून पाझरतात. त्यामुळेच या कथा मुलांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात हे खास वैशिष्ट्य.
व्यास क्रिएशन्स्च्या बालखजिन्यातील एक अष्टपैलू पुस्तक म्हणून याचा उल्लेख करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
पाने : 44
Reviews
There are no reviews yet.