मान्यवर
श्री. वा. नेर्लेकर : पन्नास वर्ष्याहूनही अधिक वर्षे पत्रकारितेत असलेले गुरुजी व्यासचे संपादक म्हणून जवाबदारी वयाच्या पंच्यांशीव्या
वर्षीही समर्थ पणे वाहत आहेत.
विजया वाड : डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिका. मराठी विश्वकोश मंडळाच्या ९ डिसेंबर २००५ पासून अध्यक्षा
विजया राज्याध्याक्ष : मराठीतील ज्येष्ठ साहित्यिका साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखिका
यु . म. पठाण : युसुफखान महंमदखान पठाण ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष. भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्काराणे सन्मानित
द. भी . कुलकर्णी : दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (१९३४-२०१६) हे मराठी कवी व साहित्य समीक्षक.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. ८३व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्षपद यांनी भूषविले होते.
रा. ग. जाधव : प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव (१९३२ – २०१६) हे मराठीतील साहित्य समीक्षक. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी,
दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक. मराठीविश्वकोश महामंडळामध्ये २३ वर्षे अभ्यागत संपादकपदापासून ते महामंडळाचे अध्यक्ष
अशा विविध जबाबदाऱ्या. २००४ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
श्रीकांत बोजेवार : दैनिक लोकसत्ताचे मुंबईतील निवासी संपादक . तंबी दुराई या टोपणनावाने ते रविवारच्या लोकसत्तेत ’दोन फुल एक हाफ’
सदर १२ हून अधिक वर्षे लिहीत आहेत.
विजयराज बोधनकर : एक व्यावसायिक चित्रकार, लेखक व वक्ता जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत,
सकाळ ह्या वृत्तपत्रांमधून लेखन व चित्रकारीता. सामाजिक उपक्रमात सहभाग. ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात
आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. चित्रकला प्रसारासाठी विविध प्रकल्प राबविले.
साहित्य प्रसारासाठी चित्रांचे प्रदर्शन.
हेमा लेले : या माजी प्राध्यापक, अभिनेत्या, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका .कवितांवर आधारित वेळूचे बन आणि बालकवितांचा
समावेश असलेल्या चिमणगाणी या कार्यक्रम निर्मितीच्या सूत्रधार .
श्रीराम बोरकर : ‘ज्येष्ठ समीक्षक’ ४५ वर्षे, वृत्तपत्रातून ग्रंथपरीक्षण विविध विषयांवरील १६ पुस्तके प्रसिद्ध.
एकनाथ आव्हाड : मराठी कवी आणि बालसाहित्यिक. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक, कथाकथनाचे कार्यक्रम. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे.
कमला मेहताअंधशाळेत, आदिवासी पाड्यांवर तसेच कुष्ठधामात विनामूल्य कार्यक्रम सादर करतात.
माधवी घारपुरे : कथा लेखिका. यांच्या कथेवर आधारित “श्वास” चित्रपटाला भारत सरकारचा सुवर्ण कमळ पुरस्कार.