परिचय

व्यास क्रिएशन्स् (स्थापना व्यास पौर्णिमा सन २००६) 

“क्रियाशील नवनिर्मितीचा वसा घेतलेली युवा प्रकाशन संस्था”

 क्रियाशील नवनिर्मितीचा वसा म्हणजे सकलसृजन कार्यासाठी सर्वस्व झोकून दिलेला एक वास्तववादी विचार होय. याच विचारधारेतून ‘व्यास क्रिएशन्स्’चा जन्म झाला. नव्या कल्पना, संकल्पना, विचार, रसिकता आणि सृजनशीलता यांचा आविष्कार म्हणजे व्यास क्रिएशन्स्.

  • प्रकाशन संस्था : प्रकाशनाच्या माध्यमातून ‘व्यास’ साहित्य आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे.दर्जा, सकसलेखन, उत्कृष्ट निर्मिती आणि कलात्मकता यांचा साहित्याविष्कार म्हणजे ‘व्यास क्रिएशन्स्.’ व्यास क्रिएशन्स् ही केवळ संस्था नाही किंवा केवळ प्रकाशनाचा व्यवसाय नाही, तर ‘व्यास क्रिएशन्स्’ ही एक ‘अक्षर चळवळ’ आहे; शब्दांशी नातं जोडणारी आणि मने जपणारी ‘कार्यशाळा’ आहे.

नीलेश गायकवाड या तरुण संचालकाच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यास क्रिएशन्स्चा हा अक्षरयज्ञ अखंड सुरूच राहणार आहे. नैतिकता, माणुसकी आणि विश्वास ही त्रिसूत्र व्यास क्रिएशन्सची आधारस्तंभ आहे.

आमची प्रकाशने:

  • खजिना बालवाचनालय – २०० हून अधिक बालसाहित्यावरील, बालसाहित्यिकांच्या लेखणीतून सजलेली मनोरंजनतून ज्ञान – आनंद देणारी पुस्तके.
  • नियतकालिके –

अ. चैत्रपालवी

ब. करीअर मन्त्र

क. प्रतिभा दिवाळी विशेषांक

ड. आरोग्यम

इ. ज्येष्ठविश्व

फ. पासबूक आनंदाचे

  •    इतर प्रकाशने – ललित कथा संग्रह, कादंबरी आणि इतर ……
  • सोहळे (जन संपर्क) : नुसते प्रकाशन नाही तर ‘दिमाखदार सोहळ्याचे नाव म्हणजे व्यास क्रिएशन्स्!’ उत्तमोत्तम कार्यक्रम, समारंभ, महोत्सव, स्पर्धा आखणारी आणि यशस्वी करणारी संस्था हा लौकिक व्यास क्रिएशन्स ची विशेष ओळख आहे.
  • ज्येष्ठ महोत्सव
  • करीअर मंत्र
  • पुस्तक आदान प्रदान
  • दिवाळी अंक प्रकाशन सोहळे
  • पुस्तक प्रकाशन सोहळे

साहित्य विश्वातील प्रकाशमान तारा – व्यास क्रिएशन्स 

सलग १२ वर्ष उत्तमोत्तम साहित्य निर्मिती . 

महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य पुरस्काराने सन्मानित . 

प्रथित यश लेखकांच्या लेखणीने सजलेली , अभिरुची संपन्न ४००हुन अधिक पुस्तक निर्मिती . 

वाचनातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी २००पुस्तकांचे खजिना बालवाचनालयाची  निर्मिती 

खजिना बालवाचनालयाची निर्मिती , प्रचार , प्रसार  करणारी प्रयोगशील  संस्था . 

.  सलग ११ वर्ष राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त दिवाळी अंक “प्रतिभा “

.  वाचकांच्या आरोग्याची काळजी वाहणारे , सर्व पॅथीचा समावेश असणारे , तज्ज्ञ डॉक्टर ,वैद्यांच्या  अनुभव संपन्न लेखणीने सजलेले  त्रेमासिक ” आरोग्यम “

.  भारतीय नववर्षानिमित्त प्रकाशित होणारा  वैविध्यपूर्ण विषयांवरचा वाचनीय अंक –चैत्रपालवी 

  तरुणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक अंक – करिअर मंत्र  

१०क्रियाशील नवनिर्मितीचा वसा  घेतलेली युवा प्रकाशन संस्था 

व्यास क्रिएशन्स च्या ह्या विश्वात आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत!!