महाराष्ट्रातील लोकधारा
जय जय महाराष्ट्र माझा...
गर्जा महाराष्ट्र माझा...
असे गौरवगीत गाताना आपला ऊर अभिमानाने फुलून येतो. आपण महाराष्ट्रात जन्मल्याचा, मराठी असण्याचा सार्थ अभिमान आपल्यात जागा होतो. पण तरीही आपल्याच महाराष्ट्रातील अनेक संत, महात्मे, आपल्या परंपरा, संस्कृती, लोककला यांचा इतिहास आपल्याला.. विशेषतः आजच्या पिढीला पूर्णत: माहीत नसतो. याचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि बदलत चाललेली सामाजिक, कौटुंबिक संस्कृती. म्हणूनच बालदोस्तांना आपल्या महाराष्ट्रातील विविध लोककला सोप्या भाषेत सांगण्याचा हे पुस्तक म्हणजे एक छोटासा प्रयत्न. यातून महाराष्ट्रातील लेझीम, पोवाडा, लावणी, भारूड, कीर्तन, भजन, गोंधळ, जागरण, बहुरूपी, डोंबारी खेळ, मानवी वाघ, तमाशा, वासुदेव, दशावतार, दिवाळी सणाची गाणी इत्यादी विविध लोककलांची, कलाकारांच्या समस्यांची जाणीव-जागृती होण्यास व लोककला जोपासण्यासाठीचा दृष्टिकोन विकसित होण्यास नक्कीच मदत मिळेल.
व्यास पब्लिकेशन हाऊसच्या बालसाहित्यात या पुस्तकाची भर म्हणजेच बालमनाचा जागर.
₹55.00