Description
आपल्या पृथ्वीवर जवळपास 71% पाणी आणि 29% जमीन आहे. त्यातील फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य असून बाकीचे पाणी समुद्र, सागर, महासागर यांनी व्यापले आहे. आपण अशाच एका अरबी समुद्राच्या जवळ रहातो ही महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या लोकांना पर्यटनाची सुंदर पर्वणीच! पण तरीही सगळे या व अशा अनेक सुंदर समुद्रांच्या, महासागरांच्या सौंदर्याचा, पर्यटनाचा व समुद्राच्या पोटात दडलेल्या अनेक रहस्यांचा अनुभव घेऊ शकत नाहीत. या पुस्तकातील मामाकडे आलेली निलू तिच्या सोबत तीन दिवस व तीन रात्री सगळ्या वाचकांना समुद्राच्या व महासागरांच्या विलोभनीय सफारीस नक्कीच घेऊन जाईल आणि आनंद, आश्चर्याचा धक्का देईल. ही सफर भूगोलाच्या एका महत्त्वाच्या विषयावर फिरता फिरता प्रकाशझोत टाकेल याची खात्री आहे.
चला तर मग …व्यास क्रिएशन्स्च्या सुंदर पुस्तकरूपी जहाजात बसून करूया… सफर समुद्राची!
पाने : 24
Reviews
There are no reviews yet.