प्रकाशने

४५० हुन अधिक पुस्तकांचे प्रकाशन व्यास क्रिएशन ने केले आहे. यात कथा संग्रह, कविता संग्रह ,कादंबरी, ललित लेखन,अनुवादित ,ऐतिहासिक ,संत साहित्य सोबत कुमार बाल वाचकांसाठी असलेल्या पुस्तकांचा एक आगळा वेगळा संग्रह आहे. विजया  वाड,  विजया राज्याध्यक्ष, यु. म. पठाण , अनुराधा कुलकर्णी, संपदा वागळे, एकनाथ आव्हाड, हेमा लेले, वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांसारख्या नामवंत लेखकांचा समावेश आहे.
ज्येष्ठ  विश्व:
ज्येष्ठांसाठी  समर्पित एक आगळ वेगळं मासिक.
यात रोजच्या जीवनात  येणारे येणारे अनुभव ,सुख दुःख त्यांच्या आर्थिक समस्यांवर  भाष्य करणार एक मासिक.
खजिना संच:
 व्यास क्रिएशन ची एक वेगळी संकल्पना  व एक संकल्प
बालवाचकांना  भरपूर वाचायला मिळावं त्या योगे  त्यांचा सर्वांगीण विकास घडू शकेल अशी आमची धारणा आहे.  म्हणून व्यास क्रिएशन ने खजिना संच  हा उपक्रम सुरु केला.  विशेषतः खेड्यापाड्यातील  मुलांना पर्यंत पुस्तके  पोहचवीत त्यांना वाचनाची आडवं लागावी म्हणू खाऊच्या पैश्यात पुस्तके या संकल्पनेतून खजिना संच उदयास आला त्यात २५० हुन अधिक पुस्तके आहेत.
आरोग्यम:
दैनंदिन जीवनात आरोग्याची निगा कशी राखावी यावर भाष्य करणारे हे त्रैमासिक. रोजच्या धावपळीत काय हवं काय नको सांगत तज्ञ डॉक्टर वैद्य यांच्या विविधांगी लेखणी वाचकांचं आरोग्याची काळजी घेणार एक त्रैमासिक.
दिवाळी अंक:
प्रतिभा, आनंदाचे पासबुक हे आमचे वार्षिक दिवाळी अंक .
त्याच सोबत ज्येष्ठ विश्व या मासिकाचे व आरोग्यम  त्रैमासिकाचे दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात.
प्रतिभा या दिवाळी अंकास गेली सात वर्ष महाराष्ट्रात प्रतिष्ठित समजले जाणारे दिवाळी अंकाचे पुरस्कार मिळाले आहेत.
अधिक माहितीसाठी :